खामगाव :- खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथून २२ वर्षीय एक तरुणी अचानकपणे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. कु. वैशाली प्रकाश माळोकार असे बेपत्ता तरुणीचे नाव असून, ती दिनांक १० मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कोणालाही काही न सांगता घराबाहेर पडली, मात्र सायंकाळपर्यंत घरी परतली नाही.
परिवारातील सदस्यांनी तिचा नातेवाईकांकडे, परिसरात व विविध ठिकाणी शोध घेतला, मात्र ती कोठेही आढळून आली नाही. अखेर वडील प्रकाश लक्ष्मण माळोकार यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून 2 पोलिसांनी बेपत्ता तरुणीची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव करत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा