मलकापूर : आगामी पावसाळा आणि परिणामी पुर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे कार्यक्षम लॉजीस्टोक्स आणि साठवणुकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता राज्यातील स्वस्त धान्य दुकानात अवधान्याची आगाऊ उचल करण्यास केंद्राने मंजूरी दिली आहे. त्यामुळे राज्याच्या अन नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांनी ऑगस्ट २०२५ पर्यंत निश्चित केलेल्या रेशनच्या अनधान्याची उचल ३० मे पर्यंत करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
राज्य शासनाच्या अज नागरी पुरवठा विभागाने काढलेल्या ९ में रोजीच्या आदेशात नमूद केले आहे की, लवकरच होऊ घातलेला पावसाळा तसेच परिणामी
पुर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. देशातील
राज्ये व केंद्र शासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभाध्यर्थ्यांना अन्न, धान्याचे वितरण करण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ऑगस्ट २०२५ पर्यंत एनएफएसए अंतर्गत वाटप केलेल्या अन्न धान्याची आगाऊ उचल करण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. सदर अन्न धान्याची उचल व वाटप राज्यांनी ३० मे पर्यंत
करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार एनएफएसए अंतर्गत माहे ऑगस्ट २०२५ पर्यंतची अन्न धान्याची उचल आणि वाटपाची कार्यवाही ३० मे पर्यंत करण्याचेही आदेशात निर्देशित केले आहे.
याबाबतचा आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाचे कक्ष अधिकारी महेश कानडे यांनी जारी केला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा