मलकापूर :- मलकापूर तालुक्यात गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या लोकांनी नवीन रेशन कार्ड काढले आहे अशा लोकांना आता रेशन कार्ड वर धान्य सुरू होणार आहे याबाबतची सूचना पुरवठा अधिकारी हरणे यांनी दिली असून, रेशन कार्ड मधून ज्या कुटुंबातील व्यक्ती मयत झालेली आहे अशा मयत लोकांना रेशन कार्ड मधून कमी केल्याने इष्टांक आपोआपच वाढला आहे त्यामुळे नवीन व विभक्त रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार असून ज्या लोकांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून धान्या करता तहसील कार्यालय मलकापूर येथे अर्ज दाखल करून त्याची ओसी घेतलेली आहे अशा कार्डधारकांना सुचित करण्यात येते की त्यांनी आपली ओसी व रेशन कार्डातील सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड व रेशन कार्ड ची झेरॉक्स घेऊन तात्काळ पुरवठा विभाग मलकापूर येथे पुरवठा निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा .
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा