बुलढाणा :- शहरालगतच्या ज्ञानगंगा अभयारण्य परिसरातील जंगलात एका सुमारे ४० वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना १० मे रोजी उघडकीस आली.
बोरखेड गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यालगतच्या जंगलात हा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीच्या अंगावर पिवळ्या रंगाचा शर्ट व निळसर रंगाची जीन्स पँट होती, तसेच डोक्यावर शेंडी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या व्यक्तीची ओळख पटलेली नसून, पोलिसांनी नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे. कोणीही संबंधित व्यक्तीबाबत माहिती ओळखत असल्यास त्यांनी तत्काळ बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक कैलास जाधव, तसेच पोलीस कर्मचारी राजू सोनुने व सुनील वाघ यांनी केले आहे. पुढील तपास सुरू असून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा