अज्ञात वाहनाचा कट; दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी, दाताळा टोलनाका जवळील घटना !


मलकापूर :- बुलडाणा रोडवरील दाताळा टोलनाक्याजवळ सोमवारी (५ मे) रात्रीच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने कट दिल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला.

तब्बल दीड तास तो रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडून होता. अमृत सचिन मख (वय २४, रा. तळणी, ता. मोताळा) हा सुरतहून मावशीच्या लग्नासाठी तळणी येथे येत होता. रात्री आठच्या सुमारास दाताळा टोलनाक्यानजीक त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट दिला, त्यामुळे तो रस्त्यावर फेकला गेला. अपघाताची माहिती मिळताच अॅड. हरीश रावळ, गजानन ठोसर, अनिल गांधी यांनी तातडीने रुग्णवाहिकेची व्यवस्था करून त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आधार कार्डवरून त्याची ओळख पटवून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. नंतर अधिक उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.


बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने