जळगाव : पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर सैन्य दलातील रजेवर गेलेल्या सर्व निमलष्करी जवानांच्या सुट्या रद करण्यात आल्याने त्यांना तातडीने मुख्यालय गाठण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार, जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील मनोज पाटील हे अद्याप लग्नाची हळद फिटली नसतानाही देशसेवेसाठी गुरुवारी रवाना झाले..
मनोज पाटील सन् २०१७पासून सैन्य दलात कार्यरत आहेत. नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी विवाह कुळल्याने ते काही दिवसांसाठी गावी सुटीवर आले होते. पाच मे रोजी त्यांचा विवाह पाचोरा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला
मात्र, सीमेवर बुद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांना तातडीने कर्तव्यावर
हजर राहण्याचे आदेश लम्माच्या दुसन्याच दिवशी प्राप्त झाले. त्यानुसार, जवान पाटील यांनी कर्तव्याला प्राधान्य देत गुरुवारी तातडीने सीमेवर रवाना निर्णय घेतला. होण्याचा निर्णय घेतला
कुटुंबाबरोचर आनंद साजरा करत असताना मुलाने देशसेवेला प्राधान्य दिले. त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे, असे मनोज यांचे वडील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले,
देशापेक्षा मोठे काहीही नसल्याची भावना जवान मनोज यांची नववधू यामिनी हिने व्यक्त केली.
दरम्यान, जवान मनोज पाटील गुरुवारी कर्तव्यावर निघाले असताना त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा रेल्वे स्थानकावर नववधू यामिनीसह आई, वडील, भाऊ व इतर नातेवाईक आले होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा