बन्सीलाल नगर रस्त्याची दुर्दशा....

मलकापूर:- मलकापूर ग्रामीण मधील बन्सीलाल नगर रस्त्याची दुर्दशा होऊन ठीक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. पारख नगर, चैतन्यवाडी, कार्तिक अपार्टमेंट, श्री सिमेंट, रामदास मार्ग ते चक्रधर मार्ग येथील स्थिती अतिशय बिकट झाली आहे. हम रस्त्याची ही अवस्था तर आतील रस्त्याची दशा बोलायला नको. त्यामुळे विशेषतः जेष्ठ नागरिक, स्त्रीया, लहान मुले याची खूप गैरसोय होत आहे. हा रस्ता अनेक नगरांना जोडलेला असल्यामुळे या रस्त्यावर खूपच वर्दळ असते वाहनधारकांना खड्ड्यामुळे कसरत करून जावे लागते त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. टीपर, चारचाकी, दुचाकी मुळे तर रस्त्याची दुर्दशा झाली आहे. नुकत्याच झालेला अवकाळी पावसामुळे तर खूपच बिकट परिस्थीती झाली आहे. तसेच ग्रामपंचायतीने पाणी पुरवठयाचा कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाची
पाईपलाईन टाकल्यामुळे ठिकठिकाणी नळ दुरुस्ती करते वेळी बरेच खड्डे करून रस्त्याची दुरवस्था केलेली आहे. याचा त्रास ग्रामस्थांना भोगावा लागत आहे याकडे ना ग्रामपंचायत प्रशासक दूरलक्ष होत असतांना दिसत आहे. याl उदासीनतेमुळे ग्रामस्थ बेजार
व त्रस्त झाले आहे तेव्हा रस्त्याची
तातडीने दुरुस्ती करावी ही विनंती
ग्रामस्थांनी केली आहे. जर वेळीच या समस्याकडे लक्ष न दिल्यास ग्रामस्थांना
लोकशाही मार्गाने आंदोलन करावे
लागेल आणि  ग्रामपंचायतीच्या निवडणुका नजीकच्या काळात होऊ घातल्या आहे तेव्हा भावी सरपंच माजी सदस्यांनी या बाबत जातीने लक्ष घालावे अशी विनंती केली आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने