मलकापूर : स्थानिक जयभिम मित्र
मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे मलकापूर शहरात याही वर्षी २५ मे रोजी बुध्द जयंती सोहळा मोठ्या उत्साहात भरपावसात संपन्न झाला.
तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या जयंती निमित्ताने सर्वप्रथम सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील बुध्द विहारात धम्मवंदना, दुपारी ५ वाजता रेल्वेस्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भिक्षु संघासह तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या मुर्तीची शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आ. चैनसुख संचेती यांच्या हस्ते हिरवी झेंडी देवून शोभायात्रेला प्रारंभकरण्यात आला. सदर शोभायात्रा शहरातील विविध प्रमुख मार्गावरून निघून शोभायात्रेचा समारोप स्थानिक ऐतिहासीक सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात सायंकाळी ७वाजता करण्यात आला.
समारोपीय व जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी पिरीपाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे हे होते. तर आ. चैनसुख संचेती, आ. सिध्दार्थ खरात, जिल्हा उपाध्यक्ष
गजाननदादा तायडे, मनोहरराव दोडे, जिल्हा सचिव भास्करराव इंगळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष यश संचेती आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी आ. सिध्दार्थ खरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बौध्द समाजाने आपल्याच समाजात असलेल्या शेनातील किळे व समाजातील दलालांपासून सावधान रहावे, तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोठेही बौध्द समाजावर अन्याय झाल्यास त्याची वाचा मी विधानसभेत मांडल्याशिवाय राहणार नाही, असे बोलतांना सांगितले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बेंझो कंपनीतील अधिकारी अमोल तायडे यांचा मुलगा स्पर्श अमोल तायडे याने राष्ट्रीय सॉफ्ट टेनिसमध्ये ब्रान्झ मेटल जिंकल्याबद्दल तर भक्ती क्षिरसागर हिने सॉफ्ट टेनिसमध्ये सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल, तसेच तसेच दरवर्षीचा प्रतिष्ठेचा बुध्दभूषण पुरस्कार भिमनगर येथील सामाजिक कार्यकर्त्या, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा सौ. प्रमिलाताई इंगळे यांना आ. सिध्दार्थ खरात यांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले. या जयंती उत्सव सोहळ्याला शहरातील व ग्रामीण भागातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयभिम मित्र मंडळाचे अध्यक्ष रिकीभाई राजाभाऊ सावळे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. तर दिवसभर शहरामध्ये सुरू असलेल्या रिमझिम पावसामध्ये सुध्दा तथागत भगवान गौतम बुध्द यांची शोभायात्रा व विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा