अत्याचार प्रकरणातील दोन शिक्षकांवर निलंबनाची कारवाई !


मलकापूर : विद्यार्थ्यांच्या आईवर अत्याचार करणाऱ्या दोन शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

समाधान आत्माराम इंगळे आणि अनिल नीना थाटे अशी आरोपी शिक्षकांची नावे आहेत. हे दोघे नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षकपदी कार्यरत होते. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी या दोघांवर २२ एप्रिल रोजी गुन्हे दाखल केले. समाधान इंगळे हा पीडितेच्या मुलाचा वर्गशिक्षक, तर अनिल थाटे हा याच शाळेत शिक्षक होता यामुळे पीडित महिला व त्यांची ओळख झाली.

या शिक्षकांनी 'तुझ्या मुलाला चांगले मार्क देऊ व पहिला नंबर देऊ' असे सांगून मानसिक दबाव आणून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तक्रारीत नमूद होते. त्यांनी तिला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करत जिवे मारण्याची धमकीही दिली. वेळोवेळी तिच्यावर दोघांनी बलात्कार केला. हा घटनाक्रम सप्टेंबर २०२४ ते २२ एप्रिल २०२५ या कालावधीत घडला.

या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली होती. त्यांना २२ एप्रिल ते ७ मे दरम्यान १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ४८ तासांपेक्षा जास्त काळ कोठडीत राहिल्याने त्यांचे निलंबन करण्यास शिक्षणाधिकारी अनिल आकाळ यांनी परवानगी दिली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने