खामगाव : प्रेयसीची हत्या करून तिच्याच साडीने गळफास घेत प्रियकराने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार, २ मे रोजी दुपारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील साजापूर येथे घडली.
शिवानंद रमेश जाधव (वय २६, रा. अजिंठा ता. सिल्लोड, ह.मु. साजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे, तर वैष्णवी महादेव खराटे (वय २४, रा. आवार, ता. खामगाव, जि. बुलडाणा) असे प्रेयसीचे नाव आहे. शिवानंद याचे तीन दिवसांपूर्वीच दुसरे लग्न झाल्याच्या कारणावरून दोघांत वाद झाल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
वैष्णवी खराटे ही साजापूर येथील एसबीआय बँकेच्या पाठीमागे झरीना मुसा शेख यांच्या घरात राहात होती. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत ती काम करत होती. दरम्यान, चार ते पाच महिन्यांपूर्वी शिवानंद जाधव हा तेथे तिच्यासोबत राहण्यासाठी आला होता. शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नळाला पाणी आल्याने घरमालकाची मुलगी त्यांना सांगण्यासाठी गेली. बराचवेळ दार वाजवूनही होती.
मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर घर मालकानेही आवाज दिले.
आवाज ऐकून शेजारील नागरिकही जमा झाले. त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गित्ते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल राम तांदळे, बाळासाहेब आंधळे, योगेश गोमलाडू, महेंद्र साळुंके, मंगेश मनोरे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने दार तोडून आत प्रवेश केला. एक तरुण साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तर एक तरुणी जमिनीवर निपचित पडलेली होती.
पोलिसांनी त्या दोघांना घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी त्या दोघांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तपास पोलीस अंमलदार मंगेश मनोरे करत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा