मलकापूर :- जिओ ही कंपनी
सुरुवातीपासूनच इतर मोबाईल कंपन्यांना काट्याची टक्कर देण्याकरिता बाजारात उतरलेली आहे सुरुवातीला एक वर्षभर इंटरनेट कनेक्शन व टॉकटाइम फ्री देऊन बाजारातील इतर कंपन्यांना जिओ कंपनीने फार मोठा शह दिला होता परंतु त्यानंतर आपल्या रिचार्ज चे दर वाढवून ग्राहकांची फार मोठ्या प्रमाणावर फसवणूक करून पैसे उकडले गेले त्याच धर्तीवर जिओ कंपनीने जिओ फायबर ही संकल्पना अमलात आणली आहे याकरिता मलकापूरच्या वाकोडी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वायरचे जाळे पसरविण्यात आले त्याकरिता स्थानिक रहिवाशांची कोणतीही परवानगी घेतली गेलेली नाही हे महत्त्वाचे. रहिवाशांच्या घरावर मोठ-मोठे लोखंडी क्लेम व वायर साठी लोखंडी अँगल विनापरवाना ठोकून वायरचे जाळे पसरविण्यात आले. परंतु सामान्य लोकांना जिओ फायबर चा लाभ मिळेल यामुळे या गोष्टीकडे सहसा कोणी गांभीर्याने लक्ष दिले नाही जिओ फायबर कंपनीचे प्रतिनिधी सुरुवातीला शंभर रुपयात एक महिना, अशाप्रकार ची स्कीम सांगून ग्राहकांना आकर्षित करतात त्यानुसार संबंधित ग्राहकाच्या घरी जिओ फायबर बसवण्यात येते त्यानंतर मोबाईल मेसेज द्वारे पाचशे रुपयात 50 दिवस अशा वेगवेगळ्या स्कीमा ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येतात या प्रलोभनांना ग्राहक बळी पडून जिओ फायबर रिचार्ज कंटिन्यू करतो परंतु महत्त्वाची गंमत म्हणजे ग्राहकाचे रिचार्ज हे 50 दिवस किंवा 90 दिवसाच्या असेल आणि रिचार्ज करून दहा दिवसातच इंटरनेट सिग्नल वीक होणे किंवा वायर तुटणे किंवा जिओ फायबर कनेक्शन पूर्णपणे बंद होणे अशा गोष्टी घडल्या तर मात्र जिओ फायबर कंपनीकडून जवळपास 20 ते 25 दिवस तुमच्या तक्रारीची दखल कुणीही घेत नाही यामुळे तुम्ही केलेले रिचार्ज निदान अर्धे तरी वाया जाते रिचार्ज ला मर्यादा असल्याकारणाने संबंधित ऑपरेटरने ग्राहकाच्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ दुरुस्ती करणे गरजेचे असते परंतु जिओ कंपनी ग्राहकांची फसवणूक करण्याकरिताच असा प्रकार करीत आहे का हा प्रश्न. ग्राहकांना पडला आहे परिणामी पाचशे ते हजार रुपयाचे रिचार्ज करूनही वेळेवर तक्रारीची दुरुस्ती होत नसेल तर ही ग्राहकांची फसवणूक म्हणावी की आणखी काही याबाबत सुज्ञ ग्राहकांनी भविष्यात जिओ फायबर कनेक्शन घेताना हजार वेळा विचार करावा कोणीही जिओ फायबरच्या मोहाला बळी पडू नये असा सल्ला पीपल्स टाइम्स वृत्तवाहिनी तर्फे देण्यात येत आहे
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा