वादळी पावसाचा कहर; शेलापूर शिवारात १७ पाळीव जनावरांचा मृत्यू !


मोताळा : - ( पीपल्स टाइम्स वृत्तसेवा) बुलढाणा जिल्ह्यात १२ जून रोजी सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात शेलापूर शिवारात मोठी दुर्घटना घडली. विजेचा जोरदार स्फोट होऊन १७ पाळीव जनावरांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, शेलापूर शिवारात वादळी वाऱ्यांसह वीज कोसळल्याने ओंकार नारायण वाघ, निना नारायण आणि सुधाकर भिकाजी बोरसे या मेंढपाळांच्या शेळ्या व मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत जनावरांची संख्या एकूण १७ असून, या घटनेची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने १३ जून रोजी दिली आहे. सध्या संबंधित मेंढपाळांकडून पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून, नुकसानभरपाईसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

इतर भागांतही नुकसान

जिल्ह्यातील काही इतर भागातही वादळी वाऱ्यांमुळे झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, वीज वितरण विभागाकडून आपत्कालीन दुरुस्तीचे काम सुरू आहे. परिणामी नागरिकांना दोन दिवसांपासून विजेच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने