धक्कादायक ! सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेतूनच अपहरणाचा प्रयत्न, मुक्ताईनगर तालुक्यातील घटना


मुक्ताईनगर :- तालुक्यातील कुऱ्हा काकोडा गावातील एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे शाळा सुटल्यानंतर शाळेतूनच बेशुद्ध करून अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा प्रकार आल्याने खळबळ उडाली. सोमवारी शाळा सुटल्यानंतर शाळेमागील दुसऱ्या जिन्याखाली बेशुद्ध अवस्थेत ही विद्यार्थीनी आढळून आली. विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासन विरोधात कुऱ्हा पोलीस चौकीत आक्रमक पवित्रा घेतला.
कुऱ्हा येथील एका शाळेत सातवीत शिकणारी विद्यार्थिनी संध्याकाळी शाळा सुटल्यावर लघुशंकेसाठी गेली होती. तीन
तरुणांनी तिला तोंडाला रुमाल लावल्याने ती बेशुद्ध झाली. त्यांनी तिच्या तोंडाला रुमाल बांधून फरफटत शाळेच्या मागे असलेल्या दुसऱ्या शाळेच्या जिन्याकडे नेले. शाळा सुटल्यावर मुलगी परतली नाही म्हणून नातेवाईकांनी शाळेत जाऊन पाहणी केली असता ती मुलगी तोंडाला रुमाल बांधलेला व अर्धवट शुद्धीवर आढळून आली. पालकांनी तिला घेऊन पोलीस चौकी गाठली. ही माहिती कळताच अनेकांनी पोलीस चौकीत गर्दी केली. या मुलीच्या सांगण्यावरून एका मुलाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.
ही विद्यार्थीनी शेजारच्या बुलढाणा जिल्ह्यातील एका गावातून कुऱ्हा येथे शाळेत नियमित येते. तिच्या सोबत गावातील इतर मुली सुद्धा असतात. सुमारे चार दिवसांपासून काही तरुण त्या मुलीच्या पाळतीवर होते. याबाबत मुलीने शाळेत सांगितले होते तसेच पालकांना सुद्धा माहिती दिली होती. त्यामुळे आज तिचे नातेवाईक कुऱ्हा येथे आले होते. शाळा सुटली तरी मुलगी दिसत नाही म्हणून पालकांनी तिच्या बद्दल शाळेत विचारणा केली. शिक्षक आणि पालक यांनी मिळून तिचा शोध घेतल्याने ती सापडली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने