मलकापूर :- शहरातील एका नामांकित कृषी केंद्राकडून बोगस बियाणे विक्री केल्याचा लासुरा व पिंपळखुटा खुर्द येथील शेतकऱ्यांकडून ठपका ठेवल्या गेला आहे. परिणामी बोगस बियाण्यांच्या विक्रीतून अनेक शेतकऱ्यांना हा फटका बसला असण्याची शक्यता आहे.
नामांकित म्हणून गणल्या जाणान्या कृषी केंद्राकडून बियाणे खरेदी केले मात्र बोगस बियाणे असल्याने अपेक्षित उपज झाली नसल्याने संबंधित शेतकऱ्याकडून सांगण्यात आले आहे. परिणामी आधीच संकटात असणारा बळीराजा हा अधिक आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित शेतकऱ्या कडे नामांकित दुकानातून सोयाबीन बियाणे खरेदी केल्याचे बिल
आहे. या बिलावर दिनांक, बियाण्यांची जात, किलोग्राम, कंपनीचे नाव, बंच नंबर, नग, दर व रक्कम नमूद आहे. हवालदिल शेतकऱ्यां पैकी लासुरा येथील शेतकऱ्याने किमत ४२०० रुपये देऊन हे बियाणे खरेदी केले आहे तर पिंपळखुटा खुर्द येथील शेतकऱ्याने किंमत १२००० रुपये देऊन हे बियाणे खरेदी केले आहे. मात्र या दोघेही शेतकन्यांकडून सदर बियाणे बोगस असल्याचा ठपका ठेवला गेला व ते आर्थिक अडचणीत आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
अशा नामांकित कृषी केंद्राकडून विक्री केलेल्या बोगस बियाण्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक. अडचणीत आला शिवाय त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा परिस्थितीत नामांकित कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांचे झालेल्या आर्थिक नुकसान व श्रमाचा मोबदला किमान नैतिकतेने दिला जाणार काय असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच आता तरी झोपलेल्या कृषी अधिकाऱ्यांना जाग येईल काय हे पाहणे आता गरजेचे आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा