मलकापूर (प्रतिनिधी) - जांबुळधाब येथील २० वर्षीय विवाहिता घरून निघून गेल्याची तक्रार मलकापूर ग्रामीण पोलिस स्टेशनला दिल्यावरून पोलिसांनी मिसींगची तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी अमोल मुरलीधर वाघळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, माझी पत्नी सौ. स्वाती अमोल वाघडे (वय २० वर्ष) रा. जांभुळथाबा ही १० जुलैच्या रात्री ३ वाजताच्या सुमारास कोणाला न सांगता घरून निघून गेली आहे.
तिच्या अंगात काळ्या रंगाचा ड्रेस, केस काळे व लांब, रंग गोरा, सडपातळ, उंची अंदाजे ५ फुट, पायात काही नाही अशा वर्णनाची मिळून आल्यास ग्रामीण पोलिस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा