२२ वर्षीय युवतीचा पाठलाग करून धमकी देणाऱ्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल !


मलकापूर (प्रतिनिधी) - २२ वर्षीय युवती आपल्या स्कुटीने घराकडे जात असतांना तिचा पाठलाग करून धमकी दिल्याप्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनला तिघांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शेलापूर बु. ता. मोताळा येथील २२ वर्षीय तरूणी ही मलकापूर येथून ड्राव्हींग क्लास संपवुन नेहमी प्रमाणे स्कुटीवर बुलढाणा रोडने शेलापुर येथे जात असतांना १५ जुलै रोजी आरोपी लवप्रित सुच्चारसिंग मेहरा (वय २१) रा. वाघुड, धीरज ज्वालासिंग राजपूत (वय २०) व ऋषिकेश श्रीराम तेजेकर (वय २०) दोन्ही रा. शिवाजीनगर मलकापूर यांनी त्यांच्या काळ्या रंगाची बुलेट मोटार सायकल क्र. पंजाब ९१ सी ४३८३ यांनी माझा वाइट उद्देशाने पाठलाग करून गाडी रोकदो नहीं तो देख मैं क्या करता हु अशी धमकी दिली. या तक्रारीवरून मलकापूर शहर पो.स्टे. ला तिन्ही आरोपीविरूध्द अप.क्र ४५३/२०२५ कलम ७८, ३५१ (२), ३(५) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने