मोताळा :- दिवसेंदिवस महीला अत्याचाराच्या घटणांमध्ये सातत्यांने वाढ होत असून त्यामध्ये भर पाडण्याचे काम मोताळा तालुक्यातील एका गावात घडले आहे. पोलीस सुत्रांच्या माहीती नुसार तालुक्यातील एका गावातील १६ अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुध्द बोराखेडी पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.
तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने बोराखेडी पोलीसात तक्रार दिली की, १३ जुलै रोजी रात्री दोनच्या सुमारास फिर्यादी ही स्वःताच्या घरात झोपलेली होती. यावेळी आरोपी शेख सलीम शेख महीम याने खिडकीतुन लाकडी काडी टोचुन तिला झोपेतुन उठवले व आरोपी शेख सलीम याने फिर्यादीचा वाईट उद्देशाने हात धरला. या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी शेख सलीम शेख रहीम याच्या विरुध्द भा.न्या. सं. कलम ७४, ७५, ३५१ (२), BNS २०२३ सहकलम ८, १२ बा.लै.अ. अधि. २०१२ कलन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास एपीआय बालाजी शेंगेपल्लु, पोकाँ आकाश यादव व बोराखेडी पोलीस अमलदार श्रीकांत चिटवार करीत आहेत.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा