नांदुरा - गेल्या ४० वर्षांपासून शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ असलेले शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख तथा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त सहसंपर्क प्रमुख वसंतराव भोजने यांनी पक्षावर नाराजी दाखवत पक्ष श्रेष्ठिंकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
वसंतराव भोजने यांनी आजतगायत शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहत शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख व आता उबाठा जिल्हाप्रमुख पद सांभाळून वसंतराव भोजने शिवसेना पक्षाला बळकटी दिली आहे. शिवसेना पक्षात फूट झाली त्यावेळेसही पक्षाशी एकनिष्ठ राहून उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख पदालाही त्यांनी वेळोवेळी न्याय दिला आहे. दरम्यान नुकत्याच उबाठा गटाने नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यात वसंतराव भोजने यांची मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली असली तरी त्यांनी मला हे शोभेचे सहसंपर्क प्रमुख पद नको म्हणत मी काम करणारा शिवसैनिक असल्याने मी पदाशिवायही काम करू शकतो. मी यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नाही व शिवसैनिक म्हणूनच काम करेल व हे पद स्वीकारतच नाही हे स्पष्ट करत आपल्या मलकापूर विधानसभा मतदारसंघाच्या सहसंपर्क प्रमुख पदाचा राजीनामा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांचेकडे पाठविला आहे
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा