सरस्वती सिनियर विद्यालय मलकापूर येथे महापुरुषांच्या फोटोचा अनुचित प्रकार उघडकीस !

मलकापूर: सरस्वती सिनियर विद्यालय मलकापूर येथे अनुचित प्रकार होत असल्याने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना जाब विचारला त्यावर अनावश्यक,उडवाउडवीचे उत्तर दिल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न उपस्थित झाला. मात्र ठाणेदार गणेश गिरी व पत्रकार करण झनके यांच्या भूमिकेने विद्यार्थ्यांचा रोष शांत होऊन महापुरुषांचे फोटो सन्मानपूर्वक भिंतीवर लावण्यात आले.
याबाबत असे की,मलकापूर येथील सरस्वती विद्यालय मध्ये शाळेचा दाखला घेण्यासाठी विद्यार्थी गेले असता महापुरुषांचे फोटो भिंतीवर दिसून आले नाही. याबाबत संबंधित शिक्षकाला जाब विचारला असता अनावश्यक व उडवाउडवीचे उत्तरे संबंधितांकडून देण्यात आली व फोटो दुसरीकडे पडलेले दिसून आले. कार्यालयात महापुरुषांचे फोटो न लावल्याने व विटंबना होत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार करण झनके यांना दिली व ते तेथे तत्काळ पोहचले. झनके यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली मात्र कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिल्याने मलकापूर शहर पोलीस स्टेशनला कारवाई अनुषंगाने गेले.ठाणेदार यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊन 
घटनास्थळी जाऊन झालेल्या घटनेचे चौकशी केली. सदर प्रकार अनुचित असल्याने ठाणेदार गणेश गिरी यांनी 
कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या रोषाला तुम्ही जबाबदार असल्याचे सांगुन तात्काळ कार्यालयात महापुरुषांचे फोटो लावून त्यांना पुष्पहार अर्पण करण्याचे सांगितले. त्यावरून विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे फोटो कार्यालयात सन्मानपूर्वक लाऊन फोटो ला हार चढवला. एकंदरीत या घटनेतून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता मात्र ठाणेदार गणेश गिरी साहेब व पत्रकार करण झनके यांच्या सकारात्मक भूमिकेने रोष शांत झाला.यावेळी उपस्थिती प्रा.शुभम प्रवीण सावळे,आदेश प्रभाकर इंगळे,विद्यार्थी हर्षल गजानन मेसरे, गौरव इंगळे, सनी इंगळे हे होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने