*गटार ( Gutter) नव्हे , गता +हार !*
_आपल्या सणांना बदनाम करायचे काम आपणच नेहमी करत असतो. आपल्या कडे आषाढी अमावस्येनंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे ती ) अमावस्या म्हणतात._
*_गटारी नव्हे गताहारी_*
_गटर हा इंग्रजी शब्द आहे. अशुध्द जलसंवहन यंत्रणेसाठीचा हा इंग्रजी प्रतिशब्द इंग्रजांच्या काळात या शब्दाशी भारताचा परिचय झाला._
_भारतीय सण हे नेहमीच पावित्र्याचं अधिष्ठान असलेले आहेत. तसेच स्थल काल व परिस्थिती यांच्याशी त्यांचा अगाध संबंध आहे._
_आषाढ हा पूर्वी विशेष करुन तीव्र वर्षावाचा कालावधी असे._
_पावसामुळे अंधारलेपण व अन्न अनुउपलब्धता हा मोठा अडचणीचा भाग असे._
_श्रावण सुरू होण्यापूर्वी व नंतरही श्रावणात कित्येकदा उपोषणाची स्थिती असे. शिवाय पावसाळी पाण्याने रोगराई पसरण्याच्या शक्यता टाळण्यासाठी उपोषणाचा वैद्यकीय सल्ला धार्मिक आधार देऊन चार महिन्यासाठी लागू केला गेला. *(चातुर्मास )*_
_उपोषण म्हणजे गताहार - गत म्हणजे गेलेला आहार म्हणजे जेवण. तर असा हा गताहार प्रारंभ आषाढी अमावस्येपासून होतो. म्हणून गताहारी अमावस्या._
_आपल्या प्रत्येक सणांचे नावे संस्कृतवर आधारित आहेत. Gutter हा इंग्रजी शब्द आपल्या सणाला खोडसाळ पणे जोडलेला आहे. आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले गेले व दुर्दैव हे की आपण ते खरे ठरवण्याच्या मागे लागलोय._
_आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवा. आपल्या प्रत्येक सणाला मोठा अर्थ आहे. आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही. आपले सण फक्त आपण आपल्या खऱ्या संस्कृतीने साजरे करू या आणि_ _जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपभ्रंशाने होणारा ऱ्हास थांबवूया._
_गटार (Gutter) नव्हे, गताहार_
_गत = मागील, जुने, गेलेले, आता नाहीं ते_
_आहार = भोजन_
_गत + आहार = गताहार_
*_जसे:-_*
_शाक + आहारी = शाकाहारी_
*_तसे:-_*
_गत +आहारी = गताहारी_
_गत +आहारी +अमावस्या = गताहारी अमावस्या_
_या दिवशी दीप पुजन करतात._
_येत्या गुरुवारी २८ जुलै २०२२ रोजी दीप अमावस्या आहे._ _हिंदूंच्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदाचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो._
_व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे._
_पण दीप पूजे ऐवजी केवळ गटारी म्हणून याला सर्वत्र कुप्रसिद्धी मिळू नये असे वाटते. जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म,आपली संस्कृती का म्हणून बदनाम करायची ? उलट महाराष्ट्रातील सर्व जातींच्या लाखो घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने या दिवशी दीपपूजनाची प्रथा आहे._
_त्यामुळे अशी आपलीच मानहानी टाळण्यासाठी गटारी हा शब्द वापरू नका ही विनंती आम्ही अनेकांना करीत असतो._ _तसेच दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात._
_हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शी पणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे हे यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित होते.
- सुयोग शर्मा,
विश्व हिंदू परिषद जिल्हा सहमंत्री
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा