*भीम आर्मी च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे फळ वाटप*

मलकापूर येथे नव्याने गठीत झालेल्या भीम आर्मीच्या तालुका कार्यकारिणीच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले .

भीम आर्मीच्या नवनियुक्त कार्यकारिणीने मलकापूर तालुक्यामध्ये आपली नवीन ओळख निर्माण केलेली असून तालुकाध्यक्ष विलास भाऊ यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक कार्यक्रम दिवसागणिक राबवले जात आहेत याचाच एक भाग म्हणून वर्धापन दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करून भीम आर्मीच्या अभिष्टचिंतन करण्यात आले. यावेळी मलकापूर तालुका अध्यक्ष विलास भाऊ तायडे, दीपक रणीत, रामभाऊ इंगळे, गोपाल पट्टे, भीमराव सुरडकर, कुसुमबाई तायडे, सुमनबाई तायडे, व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने