मलकापूर :- लोकशाहीर वामनदादा कर्डक व प्रतापसिंग दादा बोदडे यांचा संयुक्त जयंती महोत्सव २० ऑगस्ट रोजी स्थानिक महेश भवन येथे आयोजन करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी समतेचे निळे वादळ संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे उपस्थित होते. तर विशेष उपस्थित शाहीर डी. आर. इंगळे होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना माई अशांत वानखेडे पांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सांगावा, विचार व बळवळ जनमानसापर्यंत पोहोचविण्याचे अतुलनीय कार्य कलावंतांनी, शाहीरांनी आपत्त्या कलेच्या माध्यमातून केले आहे. आपत्त्या प्रभावी वाणी व गीतांद्वारे शाहिरांनी समाजाला जागृत केले, त्यांचे योगदान संस्मरणीय असून नव्या पिढीसाठी ते दीपस्तंभासारखे आहे. म्हणून कलावंत जगला पाहिजे यासाठी समाजाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी वामनदादा कर्डक फाउंडेशनचे शाहीर विजय वानखेडे बंधू, शाहीर विजयकांत मोरे, शाहीर निवृत्ती तायडे, शाहीर कृष्णाजी सुरळकर, देविदास मोरे, पुंडलिक मोरे, कमलेशभाऊ धुरंदर, साहित्यिक भिकाजी तायडे, शाहीर भिकाजी तायडे, मधुकर इंगळे, सदानंद मोरे, शाहीर डी. आर. इंगळे, लोककवी प्रतापसिंह बोदडे यांचे चिरंजीव स्वर सम्राट कुणाल बोदडे, सुरेश सुरवाडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार, मोहन खराटे, यशवंत कळासे, अशोक जाधव, गायिका रीता खंडारे आदींनी प्रभावीपणे सहभाग घेतला व कार्यक्रमाची रंगत वाढवली.
या प्रसंगी स्थानिक मान्यवर, शाहीर सामाजिक कार्यकर्ते साहित्यप्रेमी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात शाहिरांच्या जीवनकार्याचा आढावा घेण्यात आला. सत्कारमूर्ती शाहीर डी. आर. इंगळे यांनी वामनदादा व प्रतापसिंग दादांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकून आ कलावंतांनी केलेल्या कामगिरीचे विस्तृत वर्णन केले. हा इतिहासाचा लेखाजोखा कलावंतांनी व सर्व सामान्य जनतेने जोपासला पाहिजे, असे आवाहन शाहीर इंगळे यांनी केले. तसेच वामनदादा व प्रतापसिंग दादा यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजप्रबोयनाचा संदेशही देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक एन. के. हिवराळे यांनी तर सूत्रसंचालन दिलीप इंगळे यांनी केले
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा