चिखली पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सोनसाखळी चोरणाऱ्या तीन महिलांना अटक !



चिखली :-  बसस्थानक परिसरात २२ ऑगस्ट रोजी गर्दीचा फायदा घेत वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेण्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे तिन्ही आरोपी महिलांना घटनास्थळावरूनच पकडण्यात आले. गजानन नगरातील कासुबाई खरात (६५) आपल्या मुलीसोबत बसस्थानकात थांबल्या असताना महिलांच्या टोळीने त्यांना लक्ष्य केले. एका महिलेनं त्यांचा हात धरला, दुसरीने पायावर पाय दिला, तर तिसरीने गळ्यातील अंदाजे २७ हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. कासुबाई यांच्या आरडाओरडीनंतर पोलिस कर्मचारी निलेश सावळे धावून आले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी संगीता पवार (३५, विरेगाव, जालना),
निशा धोत्रे (२४, रेवकी,गेवराई) आणि शेषुबाई पवार (४४, मंगरूळ, जालना) या तिन्ही आरोपी महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथकाने ही कारवाई केली.दरम्यान, अलीकडे जिल्ह्यात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांनी सांगितले असून, सिंदखेड राजातही अशा घटना नोंदल्या गेल्या आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने