"दाम दुप्पटचे आमिष.... आणि 1 कोटी 10 लाखाचा घोटाळा !"



शेगाव :-

         शेअर ट्रेडिंगचा सापळा!

भांबळे नावाच्या भामट्याने उडवले तब्बल 1 कोटी 10 लाख !

"पैसा दुप्पट... फक्त काही महिन्यांत !" या आमिषाला बळी पडून शेगावातील नागरिकांची तब्बल 1 कोटी 10 लाखांची माया लंपास झाली आहे. भांबळे नावाच्या भामट्याने बनावट फॉर्म, व्हॉटसअप ग्रुप व खोटा परतावा दाखवून विश्वास संपादन केला आणि लाखोंची गुंतवणूक ओढवून घेतली.

पोलीस पथकाची कारवाई:

जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सुनील अंबुलकर व आर्थिक गुन्हे शाखेचे पीआय सदगिरे यांच्या पथकाने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

! सावधान !

"शेअर बाजारात शॉर्टकट म्हणजे थेट खड्डा !" लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासात बळी पडू नका, अन्यथा करोडोंचा फटका बसू शकतो.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने