व्याघ्रा नदीत दोघे बुडाले; एकाचा मृत्यू, दुसरा बेपत्ता !


मलकापूर : पोहण्यासाठी गेलेले मलकापूर तालुक्यातील दोन मुले व्याघ्रा नदीत बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दुसरा बेपत्ता आहे. निंबोळी शिवारात आज, दि. 28 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.
दसरखेड येथील शुभम राजू दवंगे (वय 16), सोहम वासुदेव सोनोने (वय 15) हे दोघे आज दुपारी तीन वाजता निंबोळी गावानजीक असलेल्या व्याघ्रा नदीपात्रात बुडाले. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी नदीकडे धाव घेतली. शिवसेना तालुकाप्रमुख विजय साठे यांनीही कार्यकर्त्यांसह घटनास्थळाकडे धाव घेतली. शोध घेतला असता शुभम दवंगे याचा मृतदेह सापडला, तर सोहमचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस काँस्टेबल रविकांत बावरकार करत आहेत.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने