साडेतीन वर्षाची मुलगी अन् दीड वर्षाचा मुलगा घरी ठेऊन 23 वर्षीय विवाहिता बेपत्ता; मोताळा तालुक्यातील घटना !


मोताळा : तालुक्यातील कंडारी गावात एका २३ वर्षीय विवाहिता रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी सकाळी घरातील कामे करून फिर्यादी शेतातून परतला व थोड्याच वेळात जेवण करून झोपला.

दरम्यान, त्याची पत्नी घरातील साडेतीन वर्षांची मुलगी व दीड वर्षांचा मुलगा घरी ठेवून कुठे तरी निघून गेली. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा थांगपत्ता लागला नाही.

याबाबत फिर्यादीने १५ सप्टेंबर रोजी बोराखेडी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद केली आहे. हरवलेली महिला उंचीने पाच फूट, बांधा सडपातळ असून, ती जांभळ्या रंगाचा ब्लाऊज व राखाडी रंगाची साडी परिधान केलेली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने