प्रभातचा अनय तायडे सीबीएसई राष्ट्रीय अॅरोबिक्समध्ये देशात दुसरा !


अकोला :- सीबीएसई राष्ट्रीय अॅरोबिक्स स्पर्धेत प्रभात किड्स स्कूलचा अनय तायडे ह्याने शिर्डी येथे झालेल्या स्पर्धेत आपल्या खेळाची चमक दाखवून सिल्वर पदकाचा मानकरी ठरला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अॅरोबिक्स राष्ट्रीय अजिंक्यपद २०२५ फ्लोअर एक्सरसाईझ या प्रकारामध्ये रौप्य पदक मिळवून अकोला जिल्ह्याचे नावलौकीक प्राप्त केले. सीबीएसई राष्ट्रीय अॅरोबिक्स स्पधेर्चे आयोजन दि. १० ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी शिर्डी येथे द्रोण अकादमीने
आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये अनय तायडेने घवघवीत यश मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उप-प्राचार्य अर्चना बेलसरे, समन्वयक मो. आसिफ, क्रीडा विभागप्रमुख स्वप्निल मांदाळे व उपविभागप्रमुख आशिष बेलोकार यांनी अनय तायडेचे कौतुक केले.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने