नालंदा नगर येथे सर्पमित्राच्या मदतीने पकडला इंडियन कोब्रा !

मलकापूर :- मलकापूर येथील बुलढाणा रोडवरील नालंदा नगर कॉलनीत काल दिनांक ०९/०९/२०२५ रोजी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास एक इंडियन कोब्रा जातीचा साप आढळून आला हा साप सर्वप्रथम कॉलनीतील रहिवासी श्री हिंगे यांच्या आवारात जाताना काही महिलांनी पाहताच आरडाओरड केली या सापाने एका बेडकाला दंश करून तो त्याला गिळण्याच्या प्रयत्नात होता परंतु महिलांनी आवाज केल्याने साप बेडकाला सोडून हिंगे यांचे घराच्या आवारात शिरला त्यानंतर महिला पुरुष व लहान मुले आपापल्या घरात गेल्यानंतर पुन्हा हा साप मरून पडलेल्या बेंडकाला गिळण्याकरिता बाहेर आला तेव्हा परत काही महिलांनी सापाला बघितले व आरडाओरड केली परंतु साप बेडकाला सोडून परत हिंगे यांच्या आवारात विटांच्या गंजी खाली दडून बसला यावेळी सर्पमित्र श्री उज्जैनकर यांना मोबाईल वरून सदर घटनेची माहिती देताच श्री उज्जैनकर हे अर्ध्या तासात नालंदा नगर येथे हजर झाले व त्यांनी आपल्या सर्प पकडण्याच्या कौशल्याने सदर इंडियन कोब्रा जातीच्या सापाला पकडून एका प्लास्टिकच्या मोठ्या बरणीत भरले व जंगलात सोडून देण्याकरिता घेऊन गेले या प्रकारामुळे काही काळ नालंदा नगर येथे भीतीचे वातावरण पसरले होते परंतु वेळीच सर्पमित्राच्या सहकार्याने परिस्थिती पूर्वपदावर आली व रहिवाशांनी सुटकेचा श्वास घेतला .

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

              घटनेचा विडीओ 👇



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने