अनंत चतुर्दशी श्रीगणेश व नवदुर्गा विसर्जन सुरक्षित व देवी देवतेची विटंबना टाळण्याकरता घाटाचे निर्माण करावे - विहिप द्वारा मागणी !

मलकापूर - हिंदू धर्म मधील धार्मिक उत्सव श्रीगणेशोत्सव, नवरात्र मध्ये मलकापूर शहर व तालुक्या मध्ये नदी, तलाव काठी विसर्जन घाट नसल्याने तालुक्यामधील भाविक भक्त मंडळी विसर्जनासाठी विसर्जन घाट बनवण्याबाबत विश्व हिंदू परिषद बजरंग दल द्वारे मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी, मलकापूर मुख्य कार्यकारी अधिकारी मलकापूर नगर परिषद यांना निवेदनाद्वारे मागणी 6 सप्टेंबर रोजी मलकापूर गणेश विसर्जन मिरवणूक प्रारंभ प्रसंगी करण्यात आली.


मलकापूर मतदारसंघात ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये श्रीगणेश, नवदुर्गा भक्त स्वतःचे जीव धोक्यात घालून नदी पात्रात उतरतात, विसर्जन घाट नसल्याने मजबुरीत ते पुला वरुन गणेश प्रतिमा फेकतात आणि याने हिंदू देवी देवतांची विटंबना होते .
विहिप द्वारे मलकापूर मतदार संघातील आपल्या देवी देवतांची विटंबना न होण्या करिता धुरपेश्वर तसेच शहर मध्ये बोदवड रोड वरील नदीच्या पुलावर विसर्जन घाट बांधण्यात यावे तसेच बोदवड रोड नदीच्या घाटात जवळ दसरा मैदान आहे या घाटांचा उपयोग विजया दशमी उत्सव पाहण्या करिता शहरातील हजारोंच्या संख्येत लोक येतात घाट निर्माण झाल्यास या लोकांनाही उत्सव बघण्यास सुविधा होईल असे निवेदन मध्ये नोंद आहे.
निवेदन देताना विश्व हिंदू परिषद बजरंग दल मलकापूर पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

        Advertise 👇 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने