मा जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदन,शासकीय अनुदान, प्रधान मंत्री सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा ! उबाठाची मागणी...



नांदुरा:-  भुदान जमीन भेटलेले शेतकरी या कंडारी ता नांदुरा जि बुलढाणा 
आदरणीय महोदय आम्ही खालील सह्या करणार कंडारी ता नांदुरा येथील शेतकरी विनंती करतो की कंडारी येथे राहत असून आमचे पुर्वज भुमिहीन असल्याने आम्हाला १९५४/५५ पासून भुदान
यज्ञ मंडळ नागपूर यांनी आम्हाला जमिनीचे पट्टे दिलेले आहेत ते सर्व पट्टे (जमिनी) आमचे ताब्यात असून आम्ही वहीती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे व १२ मधे आमचे नावे आहेत 
  असे असताना २०२१/२२ पर्यंत आम्हाला शासकीय अनुदान व प्रधान मंत्री सन्मान योजनेचा लाभ मिळत होता परंतु २०२२ पासून सर्व च अनुदान व सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही 
 तरी आपणास विनंती खामगाव व जळगाव जामोद तालुका प्रमाणे आम्हाला सुद्धा लाभ देण्यात यावा ही विनंती 
असे निवेदन आज दि २२ सप्टेंबर ला मा नायब तहसीलदार मारकड साहेब यांना वसंतराव भोजने यांच्या नेतृत्वा मधे देण्यात आले 
त्यावेळी कंडारी येथील शिवशंकर पाटील भाकरे, बळीराम मानकर , मुरलीधर टाले , जितेंद्र राजपूत, शामराव हेलोडे, रमेश हेलोडे , प्रल्हाद हेलोडे,बानुबाई भाकरे , काशिनाथ भाकरे, इंद्रायणी घोगटे, रामदास भारती, प्रभाकर हेलोडे, उत्तम हेलोडे, हरिश्चंद्र ढोले, अनिल देशमुख वाडी हजर होते

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने