मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवण !


मेहकर :  शासनाचा कोट्यवधींचा खर्च होऊनही येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात निकृष्ट जेवण मिळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आमदार सिद्धार्थ खरात यांनी वसतिगृहाला अचानक भेट देऊन पाहणी केली असता मुलींनी समस्यांचा पाढा वाचला. निकृष्ट जेवण, सडलेले फळे, पातळ दुध, पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही, स्टेशनरी दिली जात नाही, वरण-भातात खडे व कधी-कधी अळ्या असल्याची तक्रार मुलींनी केली. आमदार सिद्धार्थ खरात यांनी समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फोन करून येथील मुलींच्या समस्या सांगितल्या.

तत्काळ स्वच्छ आरोचे पाणी, स्वच्छ फळे, आणि दर्जेदार भोजन व्यवस्था, स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस ढासळत होत आहे. याबाबत वसतिगृह वॉर्डनकडे तक्रारी घेऊन गेल्यावर आम्हालाच रागावले जाते. तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असल्याने कितीही समस्या असल्या तरी तक्रार करण्याचे धाडस कोणी करत नाही, असे मुलींनी सांगितले.

आमदार खरात म्हणाले की, येथील मुलींची जेवणाची, पिण्याची पाण्याची, राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात यावी, बंद असलेले फिल्टर तत्काळ सुरू करा, यापुढे जेवण निकृष्ट किंवा सडलेले फळे खाण्यास दिले तर गाठ माझ्याशी आहे. मी कोणालाही सोडणार नाही, कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी संबंधितांना दिला.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने