मुंबईः हैदराबाद गॅझेटबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर मुळे कोणालाही सरसकट आरक्षण मिळणार नाही. हा जीआर राज्य सरकारने विचारपूर्वक काढलेला आहे. ज्यांच्याकडे खरा पुरावा आहे, जे पुराव्याने कुणबी आहेत, त्यांनाच या जीआर मुळे प्रमाणपत्र मिळायला मदत होणार आहे. - कायद्यानुसार व पुराव्यानिशी जे - लोक अर्ज करतील त्यांचा पुरावा - तपासून तो योग्य असेल तरच आरक्षण मिळणार आहे. या - जीआर मुळे ओबीसीवर अन्याय - होणार नाही. मी ओबीसी नेत्यांशीही याबाबत बोललो आहे. त्यामुळे ओबीसी समाजाने मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. हे राज्य सरकार - असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मंत्री छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांनी देखील स्पष्ट भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या जीआर मुळे ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले. मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्या आहेत, त्याबददल राज्य सरकार न्यायालयात विचारपूर्वक भूमिका मांडेल असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. ओबीसी नेत्यांना आम्ही सर्व बाबी समजावून सांगितल्या आहेत. त्यांना राजकारणासाठी काही वेगळी भूमिका घ्यायची असेल तर मी काय बोलणार? पण नवीन जीआर मुळे केवळ आणि केवळ पात्र लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. ओबीसींच्या हक्कावर कुठलीही गदा येणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने तेथील शिवाजीनगर स्थानकाचे नाव बदलून सेंट मेरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबददल मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसवर प्रखर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचे काम कर्नाटक काँग्रेस सरकार करत आहे. महाराजांना अपमानित करण्याची
पंरपरा काँग्रेसमध्ये पंडित नेहरू पंतप्रधान असल्यापासून आहे. त्या आधीही डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात नेहरूंनी छत्रपती शिवरायांबद्दल काय मत व्यक्त केले होते ते सगळ्यांना माहिती आहे. शिवरायांना अपमानित करण्याची काँग्रेसची परंपरा आहे. ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो. अलमाटी धरणाच्या संदर्भात उंची वाढविण्याचा प्रयत्न कर्नाटक सरकारने केला तर त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देउ आणि स्थगिती घेउ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या कुंकवाच्या टिळ्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कदाचित ठाकरे गटाचे हिंदुत्व परत आले असावे, नवरात्रात आईभवानीच्या कुंकवाच्या टिळ्याचे महत्व फार असते. ठाकरे गटाने तुळजाभवानीचा टिळा मला देखील पाठवावा. तो लावून आम्ही भारतविरोधी शक्तींसोबत लढू. नेपाळमध्ये जे महाराष्ट्रातले प्रवासी आहेत त्यांना सुखरूप परत आणण्याचे काम भारत सरकारकडून सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले .
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा