मलकापूर :- दिनांक १७ सप्टेंबर २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत *"सेवा पंधरवडा २०२५"* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, * 'छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व अभियान' * अंतर्गत * तहसिल कार्यालय, मलकापूर* मार्फत जनकल्याणकारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असता, सदर कार्यक्रमास * केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी *आमदार श्री. चैनसुखजी संचेती* यांच्यासह उपस्थित राहून सदर सेवा पंधरवड्यात जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच मागील दोन दिवसात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे * मलकापूर* तालुक्यासह परिसरातील जवळजवळ ७५-८० गावे बाधित झाली असून, * केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आमदार श्री. चैनसुखजी संचेती* यांच्यासह संबंधित महसूल व कृषी अधिकारी यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्त गावांचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे ३६००० हेक्टर पेरणी क्षेत्रातील जवळजवळ ३०००० शेतकऱ्यांच्या शेती व पिकाचे नुकसान झालेले आहे. सरकार बाधित शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.
यावेळी *केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे* यांनी * आमदार श्री. चैनसुख संचेती* यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक अधिकारी, तालुक्यातील ग्रामस्थ इ. उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा