नांदुरा : तालुक्यातील टाकरखेड येथील शेतकरी देविदास आत्माराम खोंदले (वय ३८) यांनी सततची नापिकी व कर्जामुळे स्वतःच्या शेतात कडूनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना दि. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. टाकरखेड येथील देविदास खोंदले यांचे महाल पिंप्री शिवारात शेत असून, या शेतावर त्यांनी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे साडेचार लाख व वडिलांच्या नावे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेंबा शाखेतून कर्ज घेतले होते. सततची नापिकी व एक दोन वर्षांपासून ऐन पीक घरात येण्याच्या स्थितीत अतिवृष्टीसदृश्य पाऊस होत असल्याने उत्पन्न मिळत नव्हते.
त्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या पश्चात वैभव, वैष्णवी व देवांश अशी मुले मुली, पत्नी, आई, वडील व लहान भाऊ असा परिवार आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा