विहिप दुर्गा वाहिनी स्थापना दिवस नवकन्या आणि शस्त्र पूजन करून थाटात साजरा !


 
मलकापूर - 
विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी खामगाव जिल्हा मलकापूर नगर व प्रखंड यांच्या वतीने दुर्गा वाहिनी स्थापना दिवस, तसेच शक्ती संचलन आणि शस्त्रपूजन कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर रोजी हुतात्मा संजयसिंह स्मारक येथून शौर्य संचलन निघाले तर समारोप चांडक विद्यालय येथे प्रबोधन द्वारे अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

 या कार्यक्रमाला मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर रिया ताई चोपडे, (प्रसिद्ध बालरोग तज्ञ ) ह्या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून दुर्गा वाहिनीच्या विभाग संयोजिका कु. राधिका ताई खेडकर , तर प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रीय सेविका समिती नगर संयोजिका,प्राध्यापक सौ.वैशाली ताई जोशी 
मातृशक्ती च्या खामगाव जिल्हा सहसंयोजिका सौ. अश्विनीताई काटे मलकापूर मातृशक्ती प्रखंड संयोजिका सौ. नेहा ताई सदावर्ते , दुर्गा वहिनीच्या खामगाव जिल्हा सह संयोजिका कु. पायल राजपूत उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांद्वारे भारत माता ,महिषासुर मर्दिनी दुर्गा माता, शस्त्र नवकण्या पूजन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली

हुतात्मा संजयसिंहजी राजपूत यांच्या स्मारकाला अभिवादन करून शौर्य पथसंचलना ला सुरुवात होऊन बस स्टॅन्ड, गाडगे महाराज टी पॉइंट, चांडक विद्यालय असे काढण्यात आले. दरम्यान चौका चौकामध्ये प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले.
.कार्यक्रमात दुर्गा वाहिनी कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. शक्ती संचलनानंतर शस्त्रपूजन विधी पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला मार्गात मुलींनी युद्ध यांचे प्रात्यक्षिक सादर केले.

दुर्गा वाहिनी ही विश्व हिंदू परिषदेची युवतीची शाखा आहे. दुर्गा वाहिनी ची स्थापना 1991 मध्ये झाली आणि साध्वी ऋतंभरा या तिच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. दुर्गा वाहिनीचे उद्दिष्ट मुलीना सक्षम करणे, अधिकाधिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे,दुर्गा वाहिनी सदस्य "शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक , धर्म,विकासासाठी स्वतःला समर्पित करून शास्त्रासोबत शस्त्र ज्ञान देऊन मुलींना कठीण परिस्थिती हातळण्या साठी सक्षम बनवणे हा आहे असे प्रबोधन दुर्गा वहिनी विभाग संयोजिका का राधिकाताई खेडकर यांनी केले डॉक्टर रिया चोपडे ताई यांनी नारी शक्ती मध्ये वाढणारी व्यसनधीनता याच्यावर प्रबोधन केले तर, वैशालीताई यांनी पंचपरिवर्तन कुटुंब प्रबोधन यावर उपस्थित दुर्गा आणि पालक वर्ग यांना संबोधन केले 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पायल ताई राजपूत तर सूत्रसंचालन विश्व हिंदू परिषद नगर उपाध्यक्ष भारतीताई वैष्णव, आभार प्रदर्शन नेहा ताई सदावर्ते यांनी केले सदर कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येत दुर्गा यांनी सहभाग घेतला

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने