"आपली जागरूकता – आपली सुरक्षा!"
मलकापूर :- दिवाळी सण जवळ येत असताना नागरिक सणाच्या तयारीत व्यस्त आहेत. घर सजवणे, खरेदी, प्रवास, आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण यामुळे हलचाल वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर चोरी, अपघात, फसवणूक, आणि सायबर गुन्ह्यांपासून नागरिकांनी सतर्क राहावे, या उद्देशाने एमआयडीसी मलकापूर पोलीस स्टेशनकडून दिवाळी विशेष सुरक्षा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
ठाणेदार संदीप काळे यांनी आवाहन केले आहे की, दिवाळीच्या मुट्टधांदरम्यान अनेकजण प्रवासावर जातात, त्यामुळे चोरट्यांना वाव मिळू शकतो. त्यासाठी पोलिसांनी
खालील सूचना दिल्या आहेत-
1. घर सोडताना सर्व दरवाजे आणि खिडक्या नोट बंद ठेवा.
2. दागिने, रोकड आणि मौल्यवान वस्तु बैंक लॉकरमध्ये ठेवाव्यात.
3. जर घर दीर्घकाळासाठी बंद ठेवत असाल, तर शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना माहिती द्या.
4. संध्याकाळी घरात प्रकाश राहील याची काळजी च्या टायमर लाइट्सचा वापर करा.
5. सोशल मीडियावर प्रवासाबाबत माहिती पोस्ट करू नका.
6. CCTV आणि डोअरवेल कॅमेरे कार्यरत ठेवा. 1. दुकान बंद करताना सर्व लॉक नीट लावल्याची खात्री करा.
2. मोठी रक्कम दुकानात न ठेवता बँकेत जमा करा. 3. CCTV नीट कार्यरत ठेवा आणि त्याचा बॅकअप च्या.
4. संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना शुभेच्छा. कळवा.
1. वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा.
2. वाहनात मौल्यवान वस्तू ठेवू नका.
3. चाबी नेहमी स्वत:जवळ ठेवा.
4. बाहेरील पार्किंगमध्ये CCTV लावा किंवा सुरक्षा रक्षक नेमा.
दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी आणि पैशांच्या व्यवहारांमध्ये वाढ होते. सायबर फसवणुकीपासून वाचण्यासाठी खालील बाची लक्षात ठेवा 1. विश्वसनीय ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरूनच खरेदी करा.
2. UPI/QR कोड स्कैन करण्यापूर्वी खात्री करा. 3. अनोळखी लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका.
4. बैंक खाते, OTP, पासवर्ड कोणालाही देऊ नका. त्यांनी पुढे सांगितले की, "दिवाळीच्या काळात पोलिसांचे गस्त वाढविण्यात येईल, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून सुरक्षित, आनंदी आणि शांततेची दिवाळी साजरी करावी, पोलिस प्रशासनाकडून समस्त जनतेला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा