जळगाव : एका २२ वर्षीय विवाहितेने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर साडीच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील गोपाळपूरा भागात उघडकीस आली..या प्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत विवाहितेचे नाव हेमांगी तुषार अहिरे (वय २२, रा. गोपाळपूरा, जळगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेमांगी अहिरे या आपल्या पतीसह गोपाळपूरा येथे राहायला होत्या. बुधवारी दुपारी त्या कामानिमित्त तिसऱ्या मजल्यावर गेल्या. मात्र बराच वेळ झाल्यावरही त्या न आल्याने सासूंनी वर जाऊन पाहिले असता दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यावर हेमांगीने साडीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. घटनेनंतर घरात एकच आक्रोश होऊन नातेवाईकांनी तत्काळ शनीपेठ पोलिसांना माहिती दिली..
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा