दिव्यांगांना ५% निधीचे वाटप करा ! दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन ची मागणी !


 मलकापूर : मलकापूर तालुक्यातील मलकापूर ग्रामपंचायत मार्फत दिव्यांग बांधवांना शासनाने मंजूर केलेला ५ टक्के निधी मिळावा, या मागणीसाठी दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक व समाजसेवक निलेश बाळू चोपडे यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी आज ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर केले.

दिव्यांगांना वितरित करावयाचा राखीव ५ टक्के निधी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत प्रशासनाकडून देण्यास दिरंगाई होत असल्याने दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन
मलकापूरच्या वतीने मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले आहे.
दिव्यांग बांधवांना नियमानुसार करावयांच्या ५ टक्के निधीचे वितरण ग्रामपंचायत प्रशासनाकडून
करणे आवश्यक होते. मात्र त्यांना ते वितरित करण्यास मलकापूर ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात येत आहे. असे निदर्शनास आले आहे 
 त्यामुळे दिव्यांगांचा ५ टक्के निधी वाटपासाठी
हे निवेदन देण्यात आले आहे. येत्या आठ दिवसात ५ निधी वाटप वाटप न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा ही निलेश चोपडे यांनी दिला आहे.

या निवेदनात दिव्यांगांच्या विकासासाठी व त्यांच्या हक्काच्या निधीच्या योग्य वापरासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. निधीचा उपयोग रोजगार निर्मिती, शैक्षणिक मदत, वैद्यकीय साधनसामग्री व स्वावलंबन यासाठी करावा, अशी मागणी करण्यात आली.

निलेश चोपडे यांनी सांगितले की, "दिव्यांग बांधवांचा निधी हा त्यांच्या प्रगतीसाठी आहे. तो इतर कामांमध्ये वापरला जाणं अन्यायकारक आहे. ग्रामपंचायतींनी या निधीबाबत पारदर्शकता ठेवावी," असे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदन सादर करतेवेळी दिव्यांग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपडे दिव्यांग फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश ठाकूर महाराष्ट्र प्रदेश सल्लागार पंकज मोरे अशोक गाढवे अंकित नेमाडे संतोष गंगे प्रवीण पाटील राष्ट्रवादीचे शीख वसीम व अनेक दिव्यांग कार्यकर्ते, ग्रामस्थ व फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते. निवेदन स्वीकृतीनंतर ग्रामपंचायतीने या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने