यशसिद्धी सैनिक अकॅडमी, मलकापूर च्या -यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न !



मलकापूर : यशसिद्धी सैनिक अकॅडमी, मलकापूर येथे यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. संरक्षण सेवा, पोलीस भरती, एनडीए तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गट शिक्षणाधिकारी फाळके साहेब उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून API इंगळे साहेब, डॉ. जाधव साहेब व केशवजी गारमोडे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अकॅडमीचे संचालक श्रीकृष्ण खराटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “शिस्त, मेहनत आणि देशसेवेची भावना या गुणांच्या बळावर यश निश्चित मिळते,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात अमोल अरुण झनके यांचा यशस्वी विद्यार्थी म्हणून विशेष सत्कार करण्यात आला. समारंभ यशस्वी करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा दांडगा अनुभव असलेले शिक्षक मनोहर पंजाबराव जवरे तसेच ग्राऊंड प्रशिक्षक मनोहर नरवाडे साहेब यांनी मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर पाटील सर यांनी केले. या प्रसंगी अकॅडमीचे शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने