नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर !

राज्य निवडणूक आयोग यांनी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्या बाबतचे अधिकार जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांना अनुषंगिक तरतुदीप्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून अधिकार प्राप्त करून दिले आहेत. त्या अनुषंगाने मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यामध्ये मतदार प्रभागातून मलकापूर नगर परिषदेच्या घेण्यात येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या संबंधित नेमणुका व तारखा निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिदि यानी एका प्रसिध्दी पत्रका द्वारे कळविले आहे.

विलेल्या प्रसिध्दी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, प्रभागाचे नाव किंवा क्रमांक १ ते १५. निर्वाचन अधिकाऱ्याचे नाव, पदनाम संतोष शिंदे, उपविभागीय अधिकारी, मलकापूर, जि. बुलढाणा, अ. सहायक निर्वाचन अधिकाऱ्याचे नाव, पदनाम संजय केदार, मुख्याधिकारी न प मलकापूर, राहुल तायडे, तहसीलदार तथा अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी, मलकापूर, नामदिर्नेशन पत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्या करिता उपलब्ध असल्याचा कालावधी दिनांक १०/११/२०२५ ते दिनांक १७/११/२०२५ (खेळ सकाळी ११ ते दुपारी ३.०० वा पर्यंत), वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी दिनांक १०/११/२०२५ ते दिनांक १७/११/२०२५ (दिनांक १७/११/२०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३.०० वा. पर्यंत) रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची जागा सभागृह, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, मलकापूर, नामनिर्देशन पत्राची छाननी व वैध रित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक - दिनांक १८/११/२०२५ सकाळी ११.०० वा. पासून, नामनिर्देशन पत्राची छाननी व मागे घेण्याची जागा सभागृह, तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत, मलकापूर, नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक (अपिल नसेल तेथे) दिनांक १९/११/२०१५ ते दिनांक २९/११/२०२५ दुपारी ३.०० वा. पर्यंत, अपिल असल्यास १) वैध रित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसांच्या आत, जिल्हा न्यायधीशांकडे अपिल करता येईल. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. दिनांक २१/११/२०२५ ते विनांक २५/११/२०२५ अपिलाचा निर्णय ज्या तारखेस करण्यात येईल त्या तारखेनंतर तिसऱ्या विवशी किंवा तत्पूर्वी, मात्र दिनांक २५/११/२०२५ पर्यंत.

निवडणूक चिन्ह नेगुण देण्याचा तसेच अंतिम रित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक २६/११/२०२५, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक- दिनांक ०२/१२/२०२५ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वा पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्यामा दिनांक ०३/१२/२०२५ सकाळी १०.०० वा. पासून, मतमोजणीचे ठिकाण शासकिय तंत्र माध्यमिक विद्यालय, मलकापूर, महाराष्ट्र शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे-दिनांक १०/१२/२०२५ पूर्वी कलम १९ मधील तरतुदी नुसार करण्यात येणार आहे

तसेच निवडणूक प्रक्रियेकिरता विविध पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता ३५० चे आसपास अधिकारी / कर्मचारी यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्याप्रमाणे निवडणूक यशस्वी रित्या पार पाहण्याकरिता अधिकारी कर्मचारी यांचे रीता प्रशिक्षण शिबिर १६ नोव्हेंबर, २२ नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी नियोजित आहे विविध राजकीय पक्षाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात ८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. निवडणुकी करिता क्षेत्रीय अधिकाऱ्यांची सुध्दा नेमणूक करण्यात आलेली आहे. नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये मदत कक्ष केंद्र उभारण्यात आले आहेत

त्याप्रमाणे निवडणुकीत अनु सूचित जाती २. नामाप्र ८. सर्वसाधारण २०, ज्यामध्ये अनुसूचित जाती महिला १, नामात्र ४, सर्वसाधारण १० असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. एकूण मतदान ५७,७८६ असून वामध्ये पुरुष मतदार २९,३२९ तर स्त्री मतदार २८,४६१, इतर ४ मतदान केंद्र ६८, ईव्हीएम मागणी, वाहन व्यवस्था, साहित्याची मागणी, आदर्श आचार संहिता, कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर उपमुख्याधिकारी विठ्ठल भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात आचार संहितेचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते साधारणतः ८ ते १० मतदान केंद्रावर नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी १०/११/२०२५ ते १७/११/२०२५ रोजी सकाळी ११ ते दु. ३ वा पर्यंत अशी सुधारणा करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष शिदि यांनी प्रसिध्दी पत्रकामधून कळविली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी सार्वत्रिक निवडणूक २०२५
नगर परिषद मलकापूर

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने