पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून पतीची विषारी औषध घेऊन आत्महत्या
पाचोरा : पत्नी माहेरी गेल्याच्या तणावातून एका ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून तरुणाला प्रकृती अस्वास्थामुळे दाखल केल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान संतोष पाटील (वय ३७, रा. नाचनखेडा, ता. पाचोरा) असे मयत व्यक्तीचेनाव आहे.
प्लंबरचे काम करून समाधान पाटील हे आपला चरितार्थ चालवीत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती घरी परतत नव्हती. या कारणामुळे समाधान पाटील हे मोठ्या मानसिक तणावाखाली होते.
दरम्यान, याच विवंचनेतून १२ नोव्हेंबर रोजी समाधान यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दोन दिवस उपचारानंतर त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, प्रदीप पाटील तपास करीत आहेत
टिप्पणी पोस्ट करा