नांदुरा तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी पूनम थोरात एंटी करप्शन च्या जाळ्यात !


नांदुरा :- नांदुरा येथील पुरवठा अधिकारी पूनम थोरात यांना लाच  स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे थोडक्यात हकीकत यातील तक्रारदार याचे घुलते गाव्या नावावर स्वस्त बान्य दुकान असून ते स्वस्त धान्य दुकान तक्रारदार हैच चालवितात. सदर स्वस्त धान्य दुकानाची दि.२९.१०.२०२१५ रोजी तपासणी पुरवठा अधिकारी नांदुरा यात्री केली होती नमुद तपासणी अहवालात काही वृद्धी न दाखविता सदरचा अहवाल तकारदार याचे बाजूने जिल्हा पुरवठा अधिकारी, पुलडाणा याचेकडे पाठविण्यासाठी तसेच स्वस्त धान्य दुकानात धान्य पुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी लोकसेवक श्रीमती पुनम थोरात पद-पुरवठा निरीक्षण अधिकारी, नादुरा हया १६,०००/- रूपये लानेभी मागणी करीत असल्याबाबतची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.

त्यानुसार आज दिनांक १४११ २०२५ रोजी प्राप्त तकारीनुसार आयोजीत पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकसेवक श्रीमती पुनम थोरात पद पुरयता निरीक्षण अधिकारी, नादूरा पानी तक्रारदार याचेकडे तक्रारदार चालवित असलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा तपासणी अहवालात काही वृद्धी न दाखविता तफारदार याने बाजुने त्यांचे बरिष्ठ कार्यालयात अहवाल पाठविण्यासाठी व त्यांचे दुकानाचा स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत गालू ठेवण्यासाठी १६,०००/- रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम आजच घेऊन येण्यास सांगीतले रणानुसार आजरोजी तहसिल कार्यालय, नांदुरा येथे आयोजीत सापळा कार्यवाही दरम्यान नांदुरा तहसिल कार्यालयामधील पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे दालनामध्ये तक्रारदार यांचेकडून १६,०००/- रूपये लागेची रक्कम स्विकारताना आलोसे श्रीमती पुनम थोरात, पुरवठा निरीक्षण अधिकारी याना रंगेहात पकडण्यात आले त्यावरुन आलोसे श्रीमती पुनम थोरात यांनेतिरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे


बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने