'पीडब्ल्यूडी'चे अभियंता सचिन तायडेंकडे मलकापूरसह जळगाव जामोद उपविभागाचा पदभार !



मलकापूर :- मलकापूर व नांदुरा तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अनेक रस्ते, इमारती व पुलांची दर्जेदार कामे करून घेणारे सार्वजनिक उपविभागाचे उपविभागीय अभियंता (वर्ग एक) सचिन तायडे यांच्याकडे आता जळगाव जामोद उपविभागाचा कार्यभार आला आहे. या अंतर्गत जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात ते कामकाज पाहतील. एकाच अधिकाऱ्यांकडे दोन-दोन ठिकाणच्या कारभाराचा ताण वाढला आहे.
अनेकदा काही रस्ते वा काही विकासात्मक कामांबाबत वाद असल्यास
सर्वसामान्य जनतेशी सौजन्यपूर्वक वागणूक व हितगुज करत अनेक अडचणींचा त्यांनी निपटाराही वेळोवेळी केला आहे. त्यांच्या कार्यकौशल्यामुळे व अंगी असलेल्या सहकार्याच्या भावनेमुळे त्यांनी अल्पावधीतच विभागातही वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यशैलीचे अनेकदा कौतुक झाले. त्यांना कार्यालयीन स्तरावरील अनेक पारितोषिकेही मिळाली. तर उत्कृष्ट अभियंता म्हणून शासनाकडे त्यांचे नामांकनही दाखल झाले होते.
नुकताच जळगाव जामोद
उपविभागाचा भार त्यांच्या खांद्यावर आला. जळगाव जामोद उपविभागांतर्गत असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यासह मलकापूर उपविभागीय उपविभागाचे मलकापूर व नांदुरा हे दोन तालुके म्हणजेच एकूण पाच तालुक्यांचा कारभार त्यांच्या देखरेखीखाली चालणार आहे. मलकापूर, नांदुराप्रमाणे जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातही त्यांच्या देखरेखीखाली अनेक रस्ते, पुलांचे, इमारतीची विकास कामे दर्जेदार होतील, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने