मलकापूर : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. सार्वजनिक हित व प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये तेल्हारा (जि. अकोला) येथील तहसीलदार श्री. समाधान सोनवणे यांची मलकापूर (जि. अकोला) तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार श्री. सोनवणे यांची नियुक्ती श्री. एम. एस. रामगुडे यांच्या बदलीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर करण्यात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आदेश मिळताच सध्याच्या पदावरून तात्काळ कार्यमुक्त होऊन नवीन पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, नगर परिषद, नगर पंचायत किंवा महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या पदावर रुजू होता येणार आहे.
शासनाने स्पष्ट केले आहे की, बदलीनंतर विहित कालावधीत पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न झाल्यास तो कालावधी “अकार्यदिन (डायस नॉन)" म्हणून गणला जाईल. तसेच, शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारची रजा मंजूर केली जाणार नाही. हा शासन आदेश डिजिटल स्वाक्षरीत असून महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा