प्रकाश पर्व कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुद्वारा संगतवाडी येथे नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न !




मलकापूर :- आज दि. १९ डिसेंबर शुक्रवार रोजी गुरुद्वारा संगतवाडी येथे नियोजित प्रकाश पर्व कार्यक्रमाच्या अनुषंगाने सर्व नियोजन समिती सदस्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.

स्पर्धांच्या निमित्ताने शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे व अन्य सामाजिक संघटनांना कार्यक्रमाचे निमंत्रण व माहिती देण्यासाठी प्रत्येक सदस्याने सक्रियपणे संपर्क साधावा, असे ठरविण्यात आले.

बैठकीत जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. पत्रकार मंडळींशी संपर्काची जबाबदारी श्री धीरज वैष्णव (शाळा-महाविद्यालय प्राचार्य) व श्री राजेंद्रजी पांडे यांच्याकडे देण्यात आली. विविध सामाजिक संस्थांसाठी श्री दामोदर काका शर्मा, राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांसाठी श्री मोहनजी शर्मा, तर विविध समाजातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्काची जबाबदारी रमेशसिंहदादा राजपूत यांच्याकडे सोपविण्यात आली.

तसेच प्रत्येक सदस्याने आपल्या-आपल्या समाजातील सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांना संपर्क करून येत्या १८ जानेवारी रोजी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्याचे ठरले.

बैठकीनंतर सर्व उपस्थितांनी लंगर भोजनाचा लाभ घेतला व पुढील बैठकीस उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने