नांदुरा :- दि १० डिसेंबर पासून पिप्री अढावचे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळे वर एकच शिक्षक असल्याने जिल्हा परिषद सदस्य वसंतराव भोजने यांनी नांदुरा पंचायत समिती ला श्री नितीन पाटील अढाव , श्री विनोद पाटील,शाळा समिती अध्यक्ष श्री शांताराम इंगळे व गावातील गावकरी यांच्या उपस्थितीत शिक्षकांसाठी निवेदन देण्यात आले होते तेव्हा पासून पिप्री अढावचे शाळेवर एक च शिक्षक असल्याने आज दि. २३ डिसेंबर ला ठरल्याप्रमाणे शाळा बंद आंदोलन करण्याचे ठरवले व तसे गट विकास अधिकारी हिवाळे साहेब गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब केंद्र प्रमुख घनोकार सर यांना तसेच शाळा समिती अध्यक्ष शांताराम इंगळे यांनी कळविले वरुन वरिल सर्व अधिकारी पिप्री अढाव चे शाळेवर येऊन शाळा समिती अध्यक्ष व सदस्यांची मनधरणी केली व आजच शिक्षकाची नियुक्ती करुन ऊध्या म्हणजे बुधवार ला शिक्षक शाळेवर हजर होईल असे आश्वासन गट विकास अधिकारी श्री हिवाळे साहेब व गट शिक्षणाधिकारी चव्हाण साहेब यांनी दिले यावेळी शाखा प्रमुख अशोक पाटील. नितीन पाटील पवन पाटील व उप सरपंच सुरेखाताई इगले व गावकरी हे उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा