जि प सदस्य वसंतराव भोजने यांचे शिक्षकांना आवाहन !


*शिक्षकांना आवाहन*
शिक्षकाची मेडिकल बिले, जि. पी. एफ चा प्रस्ताव, सर्विस बुक वेरीफिकेशन, निवड श्रेणी प्रस्ताव त्यांची अरिअस.ई बिले प्रवास बिले, वगैरे हक्काचे बिल (पैसे )पंचायत समिती चे मार्फत बुलढाणा जिल्हा परिषद मधे शिक्षणाधिकारी यांच्या कडे मान्यते साठी जातात बिल फाईल व्यवस्थित तपासून मान्यता म्हणून शिक्षणाधिकारी यांची सही होते व नंतर शिक्षणाधिकारी यांची मान्यता आल्यानंतर पंचायत समिती मधून CEFOकडे जि. प. ला बिल पाठवण्यात येते ही सर्व प्रक्रिया व्हायला ८/१५ दिवस लागायला पाहिजे जास्तीत जास्त 
*सेवा हमी कायदृयानूसार 2 महिने लागतील असेही पकडले तरी तेवढ्या कालावधीत बिले मंजूर होऊन यायला पाहिजे*
              *फक्त मेडिकल बीले ही सि. एस. कडे मंजुरी साठी न्यावी लागतात पण तिथून मंजूर होऊन आल्यावर 1 महीन्यात संबंधितांच्या खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे *पण प स मधील पहील्या टेबल पासून अर्थकारण चालू होते *व शिक्षक म्हणजे दुभती गाय* कोण्या पुढार्याला सांगितले तर पंचाईत कारण तो *टेबल वर बसलेला बाबू कोण्या ना कोण्या भाऊ चा माणूस असते* असो नांदुरा पंचायत समिती मधे कोणत्या टेबलवर कोण आहे? मला पण आज रोजी माहीत नाही पण काही शिक्षकाची एक दिड वर्षांपासून बिले थांबलेली आहे व *त्यांना पैसे नाहीत हे कारण सांगितले होते* व काही ची शिक्षकांची बिले मागून पुढे गेली ती क्रमानेच जायला पाहिजे होती असो *म्हणून आमचा जोर अन्टीकरप्शन वर असतो* मी व हरीषभाऊ नी आतापर्यंत १४/१५ अन्टीकरप्शन च्या केसेस सक्शेस केलेल्या आहेत ह्या केसेस करणे चालू च ठेवल्या की त्या वेळेस या पैसे खाणारांची धाबे दणाणते व गोरगरीबांच्या फाईल लवकर मोकळ्या होतात 
          नाही तर यांना मोकळ रान होते
   आज सर्व चौकशी करणारच आहे ज्या ज्या शिक्षकाची बिले थटकली असतील ते सर्व बिगर पैशाने काढून दिल्या जातील व बिना पैशाची कामे होत नसतील तर आमची बुलढाणा लाईन लागलेली आहे ते पण करु मग तो कोणीही असो 
संपर्क करा 
मैहुना 
वसंतराव भोजने जिल्हा परिषद सदस्य ९८२२०३९७९९ ९४२२१८४३८८

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने