विद्या विकास विद्यालय वाकोडी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी !



मलकापूर : येथून जवळच असलेल्या विद्या विकास माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष सौ. मंगलाताई पाटील, सदस्य सौ. रेश्माताई पाटील, पं.स. मलकापूरच्या कु. ठाकरे मॅडम, मुख्याध्यापक दिलीपकुमार प्राथ. शाळा अढाव, मुख्याध्यापक राहुल गायकवाड यासह महिला शिक्षिका प्रामुख्याने उपस्थित होत्या.

सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तर काही विद्यार्थीनीनी सावित्रीबाई यांच्या पोशाखात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. स्मिता मापारी मॅडम, सूत्रसंचालन विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. व्ही. कुटे आभार प्रदर्शन जी. जी. तायडे यांनी केले.


बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने