अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यात राजकीय वैमनस्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर प्राणघातक चाकूहल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडताच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर वार केला. संपूर्ण अंग रक्ताने माखले असतानाही पटेल यांनी धैर्याने स्वतःला सावरत
मदतीची याचना केली.
अकोट तालुक्यातील मोहाळा हे हिदायत पटेल यांचे मूळ गाव असून, तेथेच ही धक्कादायक घटना घडली. मदीन उर्फ कालू पटेल व त्याच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले. हल्ल्यात पटेल यांच्या मानेवर गंभीर जखम झाली आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असतानाही त्यांनी उपस्थितांना पाणी देण्याची तसेच लवकर दवाखान्यात नेण्याची अशी विनंती केली.
नात्यातील व्यक्तीने तातडीने वाहनाची व्यवस्था करत त्यांना रुग्णालयात दाखल केले.
गावातील पटेल कुटुंबातील एका गटाशी हिदायत पटेल यांचा गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय वाद सुरू असल्याची माहिती समोर येत असून, याच वैमनस्यातून हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत हल्लेखोरांचा कसून शोध सुरू केला आहे.
रुग्णवाहिकेतच हृदयविकाराचा झटका
हिदायत पटेल यांना प्रथम अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने अकोल्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र रुग्णवाहिकेत ठेवताच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने तातडीने पुन्हा अकोटमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. वृत्त प्रकाशित होईपर्यंत त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.
👇 थरारक घटनेचा विडीओ
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा