मलकापूर येथील कृषी पर्यवेक्षक अँटी करप्शन च्या जाळ्यात !



दि.०९.०२.२०२६
मलकापूर :-
थोडक्यात हकीकत यातील तकारदार हे शेतकरी असून त्यांनी कृषी यात्रीकीकरण उप अभियान योजने अंतर्गत कृषी विभागाच्या पूर्व संमतीने मळणीयंत्र खरेदी केले होते. सदर खरेदी केलेल्या मळणीयंत्राच्या अनुदानाची प्रक्रिया पूर्ण केल्याचा मोबादला म्हणून कृषी अधिकारी कार्यालय, मलकापूर येथील कृषी पर्यवेक्षक ईश्वर सावकारे है ५०००/- रूपये लाचेची मागणी करीत असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा घटकाकडे प्राप्त झाली होती.

त्यानुसार दिनांक ०६.०२.२०२६ रोजी लाच मागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता पडताळणी कार्यवाही दरम्यान लोकसेवक श्री. ईश्वर सावकारे यांनी कृषी विभागाच्या योजने मध्ये खरेदी केलेल्या मळणीयंत्राच्या अनुदानाची प्रकिया पूर्ण केल्याचा मोबादला म्हणून ५,०००/- रूपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४,०००/- रूपये लाथ रक्कम स्विकारण्यास संमती दिल्याने आज दि.०९. ०२.२०२६ रोजी मलकापूर ते बोदवड रोडवरील, पिपंळगावदेवी फाटा, राधास्वामी सत्संगजवळ येथे सापळा कार्यवाही आयोजीत केली असता तक्रारदार यांचेकडून पंचा समक्ष ४,०००/- रूपये लाच रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. त्यावरुन आलोसे श्री ईश्वर भागवत सावकारे, कुक्षी पर्यवेक्षक (उप कृषी अधिकारी) यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू आहे.
 सदरकार्यवाही -
१. मा.श्री.बापू बांगर, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती.
मो.नं.९०११३२३४२६

२. मा.श्री. सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती,
मो.नं.९७६४२१०४८५

३.मा.श्री.भागोजी चोरमले, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा. मो.नं. ९५५२५२०१८८
यांचेमार्गदर्शना खाली श्री. रमेश पवार पोलीस निरीक्षक, श्री. विलास गुसिंगे पोलीस निरीक्षक व सापळा पथक पोकों, लक्ष्मीकांत इंगळे, गजानन गाल्डे, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, चापोहेका नितीन शेटे, सर्व अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.

शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो बुलडाणा येथे दुरध्वनी कमांक ०७२६२-२४२५४८ व व्हाटस अप कमांक ९४०५०९१०६४ तसेच टोल फि कमांक १०६४ यावर संपर्क साधून तकार करण्याचे आवाहन पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी केलेआहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने